ईदी अमीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ईदी अमीन हा मध्य अफ्रिकेतील युगांडा देशाचा लष्करी हुकुमशहा व युगांडाचा राष्ट्रपती होता. याचा कार्यकाल १९७१ ते १९७९ इतका राहिला. ईदी अमीन यांची कारकिर्द ब्रिटीश सैन्यात १९४६ मध्ये भरती झाल्यापासून झाली व स्वातंत्र्यानंतर त्यांची बढती मेजर जनरल या पदापर्यंत झाली, १९७१ मध्ये त्यांनी मिल्टन ओब्टे यांचे सरकार उलथवून टाकत सत्ता हातात घेतली. ईदी अमीन यांचा राज्यकाल अनेक कारणांसाठी कायमचा लक्षात राहिल. मानवी मूल्यांची तुडवणूक, राजकिय बंदी, अनेक विवादास्पद राजकीय हत्या व भारतीयांची युगांडातून हकालपट्टी. अमीन यांच्या कार्यकालात अंदाजे ५ लाख लोकांची हत्या करण्यात आली.

लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड हा चित्रपट ईदी अमीन यांच्यावर आधारित आहे. व्हिटेकर यांनी ईदी अमीन यांची भूमिका केली आहे.