इंद्रधनुष्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य
इंद्रधनुष्याच्या निर्मितीची मीमांसा

इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आतील कडेस जांभळा रंग दिसतो.

क्वचित प्रसंगी मुख्य इंद्रधनुष्याबाहेर पसरलेले, फिक्या रंगांतील व मुख्य इंद्रधनुष्याच्या वर्णपटाच्या उलट्या क्रमाने रंग दाखवणारे (जांभळा बाहेरील कडेस व तांबडा आतील कडेस असणारे) दुय्यम इंद्रधनुष्यही दिसते.

इंद्रवज्र[संपादन]

संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असे म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते.