भारतीय व्यवस्थापन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय व्यवस्थापन संस्था (हिंदी: भारतीय प्रबंध संस्थान, इंग्रजी: Indian Institutes of Management इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट - आय.आय.एम) या भारतातील अग्रगण्य मॅनेजमेन्ट संस्था आहेत.या संस्थांमध्ये मॅनेजमेन्टवर दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला कॅट (कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेतून आणि त्यानंतर मुलाखतींमधून जावे लागते.

देशातील सर्वात पहिले आय.आय.एम कलकत्ता येथे १९५९ मध्ये स्थापन झाले. त्यानंतर अहमदाबाद येथे १९६१ मध्ये, बंगलोर येथे १९७३ मध्ये, लखनौ येथे १९८४ मध्ये, कालिकत (कोझिकोडे-कोळ्हिकोड) आणि इंदूर येथे १९९६ मध्ये, शिलॉंग येथे २००७ मध्ये, रोहतक, रांची आणि रायपूर येथे २०१० मध्ये तर त्रिचनापल्ली, उदयपूर आणि काशीपूर येथे २०११ मध्ये आय.आय.एमची स्थापना झाली. २०१४ च्या अर्थसंकल्पात सरकारने पंजाब (बहुधा अमृतसर येथे), महाराष्ट्र (बहुधा नागपूर येथे), बिहार (बहुधा गया येथे), हिमाचल प्रदेश (बहुधा सिरमौर येथे) आणि ओरिसा (बहुधा भुवनेश्वर येथे) या राज्यांमध्ये नव्या आय.आय.एमची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली.

संस्थाने[संपादन]

# संस्थेचे नाव छायाचित्र संक्षिप्त नाव स्थापना[१] स्थान राज्य/केंद्रशासित प्रदेश NIRF Ranking 2021[२]
1 भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद IIM-A 1९61 अहमदाबाद गुजरात 1
2 भारतीय व्यवस्थापन संस्था अमृतसर IIM-Amritsar 2015 अमृतसर पंजाब 67
3 भारतीय व्यवस्थापन संस्था बेंगलोर IIM-B 1९73 बंगळूर कर्नाटक 2
4 भारतीय व्यवस्थापन संस्था बोधगया IIM-BG 2015 बोधगया बिहार
5 भारतीय व्यवस्थापन संस्था कलकत्ता IIM-C 1९61 कोलकाता पश्चिम बंगाल 3
6 भारतीय व्यवस्थापन संस्था इंदोर IIM-I 1९९6 इंदूर मध्य प्रदेश 6
7 भारतीय व्यवस्थापन संस्था जम्मू IIM-J 2016 जम्मू जम्मू आणि काश्मीर
8 भारतीय व्यवस्थापन संस्था काशीपूर IIM-Kashipur 2011 काशीपूर उत्तराखंड 33
9 भारतीय व्यवस्थापन संस्था कोळिकोड IIM-K 1९९6 कोळिकोड केरळ 4
10 भारतीय व्यवस्थापन संस्था लखनौ IIM-L 1९84 लखनौ उत्तर प्रदेश 7
11 भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर IIM-N 2015 नागपूर महाराष्ट्र 40
12 भारतीय व्यवस्थापन संस्था रायपूर IIM-Raipur 2010 रायपूर छत्तीसगढ 15
13 भारतीय व्यवस्थापन संस्था रांची IIM-Ranchi 2010 रांची झारखंड 21
14 भारतीय व्यवस्थापन संस्था रोहतक IIM-Rohtak 2010 रोहतक हरियाणा 28
15 भारतीय व्यवस्थापन संस्था संबलपूर IIM-Sambalpur 2015 संबलपूर ओडिशा 61
16 भारतीय व्यवस्थापन संस्था शिलाँग IIM-S 2007 शिलाँग मेघालय 23
17 भारतीय व्यवस्थापन संस्था सिरमौर IIM-Sirmaur 2015 सिरमौर जिल्हा हिमाचल प्रदेश
18 भारतीय व्यवस्थापन संस्था तिरुचिरापल्ली IIM-T 2011 तिरुचिरापल्ली तमिळनाडू 17
19 भारतीय व्यवस्थापन संस्था उदयपूर IIM-U 2011 उदयपूर राजस्थान 18
20 भारतीय व्यवस्थापन संस्था विशाखापट्टणम IIM-V 2015 विशाखापट्टणम आंध्र प्रदेश

इतिहास[संपादन]

शैक्षणिक[संपादन]

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Technical Education | Government of India, Ministry of Human Resource Development". mhrd.gov.in. Archived from the original on 26 April 2017. 20 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "India Rankings 2020: Management". National Institutional Ranking Framework. 19 June 2021 रोजी पाहिले.