आसाराम बापू
| आसाराम बापू | |
| पूर्ण नाव | आसुमल थाऊमल सिरुमलानी |
| जन्म | एप्रिल १७ इ.स. १९४१ चैत्र कृष्ण ६, शा.श. १९९८ बेरानी, नवाब जिल्हा, सिंध |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | गुजराती, हिंदी, मराठी, इंग्रजी व अन्य अनेक भाषा[ संदर्भ हवा ] |
| प्रमुख विषय | वेद, राजयोग, भक्तियोग |
| प्रसिद्ध लिखाण | आश्रमातर्फे नित्य पुस्तके प्रकाशित |
| प्रभाव | लीलाशाह बापू |
| प्रभावित | सुरेशानंदजी महाराज, नारायण सांई, यांच्यासह भारतातील असंख्य भक्तगण |
| वडील | थाऊमल सिरुमलानी |
| आई | महेंगीबा |
| स्वाक्षरी | 120px |
| संकेतस्थळ | आश्रम.ओर्ग् |
संत आसाराम बापू, जन्मनाव आसुमल थाऊमल सिरुमलानी, (एप्रिल १७ इ.स. १९४१ - हयात) हे वर्तमान काळातील प्रसिद्ध भारतीय संत आहेत. त्यांचे अनुयायी व भक्त त्यांना "बापूजी" या आदरवाचक नावाने उल्लेखतात.
अनुक्रमणिका |
जन्म [संपादन]
आसाराम बापू यांचा जन्म भारताच्या सिंध प्रांतातील नवाब जिल्ह्यातील बेरानी या लहानशा खेड्यात झाला. त्यांचा जन्म होत असतांना गावातून एक पाळणेवाला जात होता. तेव्हा त्या पाळणेवाल्याला गावात कुणीतरी संत जन्म घेत असल्याची उपजत प्रेरणा झाली[ संदर्भ हवा ] आणि तो पाळणा घेऊन तेथे दाखल झाला, अशी आख्यायिका आहे. ही अपूर्व घटना पाहून घरातील मंडळींच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे बाळ तीन बहिणींच्या पाठीवर जन्मले हॊते. त्याचे नाव ’आसुमल’ ठेवले गेले.
बालपण [संपादन]
आसुमल (आसाराम बापू) लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धीचे आणि हसतमुख होते. त्यांची आई मेहंगीबा यांनी त्यांना लहानपणापासूनच ध्यान व पूजा करणे शिकविले हॊते. तेव्हापासून त्यांना ध्यानाची आवड आणि भक्तीची ओढ लागली होती. १९४७ मध्ये हिंदुस्थान देशाचे विभाजन झाले तेव्हा त्यांचे कुटुंब पाकिस्तानमध्ये आपली संपत्ती सोडून भारतात अमदावादला आले. त्यांनी शालेय शिक्षण मणिपूर येथे सुरू केले. परंतु त्यांना शिक्षणात रुची नव्ह्ती, त्यांची खरी ओढ अध्यात्माकडेच होती. शाळेमध्ये मधली सुटी झाल्यावर जेव्हा इतर मुले खेळात मग्न होत, तेव्हा आसुमल ईश्वराचे ध्यान करीत असत. शाळेत देखील या आसुमलचा हसरा स्वभाव बघून शिक्षक त्यांना ’हसमुखभाई’ म्हणत. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांना आपल्या राहत्या घराला निरोप द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सर्व वैभव आणि शालेय शिक्षण तेथेच सुटले.
आध्यात्मिक प्रवास [संपादन]
ईश्वराची ओढ आणि युवावस्था [संपादन]
जीवनातील संघर्ष सुरू असतांना ते सिद्धपूर येथे नोकरी करण्यासाठी आले. तेथील कृष्णमंदिरात जाऊन ते नित्य ध्यान करीत आणि व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत. नोकरी करीत असताना एक घटना घडली ती अशी - एक दिवस एक महिला त्यांच्याकडे येऊन म्हणाली की, "खोट्या खुनाच्या खटल्यात माझी दोन्ही मुले कारागृहात आहेत. त्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे" तेव्हा आसुमल म्हणाले की, "चिंता करू नका. तुमची मुले निर्दोष सुटून घरी येतील." आणि त्यानंतर खरोखरच तसे घडले[ संदर्भ हवा ]. आसुमलची ही वाचासिद्धी पाहून जनमानसांवर त्यांचा प्रभाव पडू लागला[ संदर्भ हवा ]. सिद्धपूर येथे तीन वर्षे नोकरी केल्यानंतर ते अमदावादला परतले.
पुन्हा घरात ऐश्वर्य नांदू लागले. आता आसुमलची आई त्यांच्या लग्नाचा विचार करू लागली. परंतु आसुमलचे मन पूर्णतः विरक्त होते. तरीही सर्वांनी बळजबरीने त्यांचा साखरपुडा केला. जेव्हा लग्न करून देण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आसुमलने घरातून पलायन केले. या विरक्त आसुमलला शोधता शोधता सर्वांची दमछाक उडाली. शेवटी ते भरुच येथे अशोक आश्रमात सापडले. घ्रराण्याच्या अब्रूची आण देवून त्यांना आदिपूरला आणण्यात आले. तेथे त्यांचे लग्न ’लक्ष्मीदेवी’ यांच्याशी लावून दिले. तरीही आसुमलचे मन ईश्वराशिवाय कुठेच लागत नव्हते. संस्कृत भा्षेतील ग्रंथांचा अभ्यास करीत असताना एक श्लोक त्यांच्या मनी वसला. ते थेट पत्नीकडे आले आणि तिला समजावले की, "मी आता घर सोडून जात आहे. ईश्वरप्राप्ती करून पुन्हा परत येईन."
ईश्वराचा शोध [संपादन]
आसुमल घराचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी निघाले. केदारनाथ व वृंदावन येथे भगवंताचे दर्शन करीत असतांना त्यांना नैनीताल येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. तेथे गेल्यावर त्यांना त्यांचे गुरु ब्रह्मनिष्ठ संत लीलाशाह बापू यांचे दर्शन झाले. ७० दिवसांची कठोर परीक्षा घेऊन लीलाशाहजींनी आसुमलला शिष्य म्हणून स्विकार केले. परंतु "ध्यान आणि भजन घरीच करीत जा." असा आदेश दिला. गुरुंच्या आज्ञेने घरी परतत असतांना ते एका रात्री नर्मदा नदीकिनारी ध्यानास बसले होते. कुणीतरी डाकू असावा असा विचार करीत लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा आसुमलचे ध्यान तुटले आणि त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहर्यावरील अपूर्व तेज पाहून कुणी त्यांना मारण्यास धजावले नाही[ संदर्भ हवा ]. ते उठले आणि चालू लागले.
"समदृष्टी पाही सर्वांना, चालही शांत गंभीर ।
सशस्त्र गर्दीला सहज, चिरून गेले पीर ॥"
त्यानंतर त्यांच्या आई व पत्नी तेथे दाखल झाल्या. सर्व लोकांनी समजूत काढून आसुमलला त्यांच्याबरोबर धाडले. मात्र, अहमदाबादला जात असतांना मियागाव येथून पळून ते गुरूंना भेटण्यासाठी मुंबईला आले.
ईश्वरप्राप्ती [संपादन]
लीलाशाह बापू आपल्या प्रिय शिष्याला पाहून अतिशय आनंदित झाले. आसुमलची ईश्वरासाठीची ओढ पाहून त्याला परमतत्त्वाचे दर्शन करवून देण्याचे त्यांनी ठरविले. गुरुकृपेने आश्विन शुद्ध द्बितीया या दिवशी आसुमलला आत्मसाक्षात्कार झाला. तेव्हापासून ते संत आसाराम बापू म्हणून गौरविले जाऊ लागले.
"पूर्ण मिळविली गुरुकृपा, पूर्ण गुरूचे ज्ञान ।
आसुमलातून प्रगटले, सांई आसाराम ॥"
दैवी कार्य [संपादन]
तेव्हापासून ते आगळ्याच ’ब्रह्मानंद मस्तीत’ राहू लागले. गुरूंनी त्यांना "लोकांना ’ज्ञानोपदेश’ देऊन लोकांचा उद्धार कर" असा आदेश दिला. नंतर आसाराम बापू गुजरातमधील डीसा गावात आले. असे म्हणतात की, तेथे एका मृत गायीला दयेने पुन्हा जिवंत केले[ संदर्भ हवा ]. तेव्हापासून लोक त्यांना ओळखू लागले.
