आल्फ्रेड हिचकॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक

सर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक (ऑगस्ट १३, इ.स. १८९९ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हा इंग्लिश भाषक चित्रपटांचा ब्रिटिश दिग्दर्शक व निर्माता होता. रहस्यपटांतील व मानसशास्त्रीय भयपटांतील नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी तो ओळखला जातो. युनायटेड किंग्डम या त्याच्या मायदेशात मूकपटांमधील व बोलपटांमधील यशस्वी कारकिर्दीनंतर हिचकॉक अमेरिकेतील हॉलिवुड चित्रपटसृष्टीत गेला. ब्रिटिश नागरिकत्व अबाधित राखून इ.स. १९५६ साली तो अमेरिकेचा नागरिक बनला.

आपल्या ५० वर्षाहून दीर्घ कार्यकालावधीत हिचकॉकने स्वतःची एक वेगळ्या व लक्षणीय दिग्दर्शन शैलीसाठी म्हणून ओळख करून घेतली.[१] त्याने कॅमेरा कलाकाराच्या नजरेचा वेध घेईल अशा प्रकारे कॅमेरा वापरण्याची एक नवीन पद्धत अस्तित्वात आणली ज्यामुळे प्रेक्षकांना खाजगीतील दृश्य बघितल्यासारखे वाटेल. [२] प्रेक्षकांची उत्कंठा, भीती किंवा जवळीक ताणावी अशी दृश्ये तो निवडी आणि त्यांचे नवनवीन तऱ्हेने संकलन करी.[२] त्याच्या गोष्टीत बऱ्याचदा कायद्याच्या कचाट्यातून दूर पळणारा पुरुष एका सुंदर बाईसोबत असे.[३]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Alfred Hitchcock's America (एप्रिल/मे २००७).
  2. २.० २.१ Film Techniques of Alfred Hitchcock. Borgus Productions (डिसेंबर २००७).
  3. NOTORIOUS! (Hitchcock and his icy blondes) (१८ जुलै २००९).


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.