आर.के. नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
आर.के. नारायण
RKNarayan.jpg
पूर्ण नाव रासिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी
जन्म ऑक्टोबर १०, इ.स. १९०६
चेन्नई, तमिळनाडू, भारत
मृत्यू मे १३, इ.स. २००१
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा इंग्रजी
साहित्यप्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती मालगुडी डेज, स्वामी अॅण्ड फ्रेण्ड्स, दी बॅचलर ऑफ आर्ट्स, दी गाईड, दी मॅन-इटर ऑफ मालगुडी
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९५८), पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९६४), पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. २०००)

आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील.

१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट दी गाईड. यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. तर त्यांच्या मिस्टर संपत आणि दी फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्ताकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या गोष्टींवर आधारीत दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.

साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

नारायण यांचे लहान भाऊ आर.के. लक्ष्मण हे अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकात लक्ष्मण यांची व्यंगचित्रे "यू सेड इट" या शिर्षकाखाली गेली अनेक वर्षे नियमीतपणे प्रसिद्ध होत आली आहेत.


साहित्य निर्मिती


Swami And Friends, Malgudi Days, The Bachelor Of Arts, The Dark Room, The English Teacher, Mr. Sampath - The Printer Of Malgudi, The Financial Expert, Waiting For The Mahatma, The Guide, The Man-Eater of Malgudi, The Painter Of Signs, A Tiger For Malgudi, Talkative Man, The World Of Nagraj, Grandmother's Tale, A Horse And Two Goats, An Astrologer's Day And Other Stories, Lawley Road, Under The Banyan Tree And Other Stories, My Days, My Dateless Dairy, The Emerald Route, Next Sunday, Reluctant Guru, A Writer's Nightmare, The World Of Story-Teller

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये