आयबीएन-लोकमत
| आयबीएन-लोकमत | |
|---|---|
![]() |
|
| सुरुवात | ६ एप्रिल, इ.स. २००८ |
| नेटवर्क | टीव्ही १८ |
| मालक | नेटवर्क १८, लोकमत |
| ब्रीदवाक्य | चला जग जिंकुया !!! |
| देश | भारत |
| प्रसारण क्षेत्र | भारत |
| मुख्यालय | विक्रोळी, मुंबई |
| भगिनी वाहिनी | आयबीएन ७, सीएनएन आयबीएन, सिएनबिसी आवाज, सीएनबीसी टीव्ही १८ |
| प्रसारण वेळ | २४ तास |
| संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
आयबीएन-लोकमत ही बातम्यांच्या प्रसारणाला वाहिलेली मराठी भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण ६ एप्रिल, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. नेटवर्क १८ आणि लोकमत न्यूज प्रायव्हेट लि. यांचा हा संयुक्त प्रकल्प असून सुरुवातीपासूनच या वाहिनीच्या संपादनाची जबाबदारी मराठीतील प्रथितयश पत्रकार निखिल वागळे यांच्याकडे आहे. वाहिनीचे मुख्यालय मुंबईतील विक्रोळी येथे आहे. मंदार फणसे हे या वृत्तवाहिनीचे एक वृत्तसंपादक आहेत.
२०११ सालातल्या सर्वांत जास्त वृत्तविषयक कार्यक्रमासाठीचे राष्ट्रीय, तसेच मटा सन्मान सारखे पुरस्कार आयबीएन-लोकमतने मिळवले आहेत. ज्या व्यक्ती व संस्था महाराष्ट्राच्या प्रगतीला कारणीभूत झाल्या त्यांचा परिचय करून देणार्या आयबीएन-लोकमतच्या लघुपटमालिकेला, ‘गर्जा महाराष्ट्र’ ह्या महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वांत जास्त बक्षिसे मिळाली.
वृत्तवाहिनी सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी या वाहिनीने पुरस्कार मिळविले आहेत . रिपोर्ताज, बॉलीवूड ब्लॉकबस्टर सारखे कार्यक्रम या वाहिनीवर मराठी जगतात पहिल्यादांच प्रसारित केले गेले.
मुख्य कार्यक्रम [संपादन]
रोजचा 'आजचा सवाल' हा रोजचा चर्चात्मक वार्तांकनाचा कार्यक्रम असतो. 'ग्रेट भेट' हा साप्ताहिक कार्यक्रम असतो. दर तासाला एक बातमीपत्र रोज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू असते. सकाळी ८ वाजता ‘सलाम महाराष्ट्र’ हा बातम्यांबरोबरच प्रख्यात व्यक्ती, स्थळ किंवा दिनविशेषानुसार काहीतरी विशेष असणारा कार्यक्रम आहे.सकाळी साडे नऊ वाजता आजच्या सवालचे पुनःप्रक्षेपण करण्यात येते. १०३० वाजता शो टाईम तर ११३० वाजता चॅनेल सर्फिंग नावाचे मनोरंजन विश्वाची सफर घडवणारे कार्यक्रम सादर केले जातात.दुपारी १.३० आणि ४.३० वाजता talk time हा माहितीपर चर्चात्मक आणि प्रेक्षकाना प्रश्न विचारायची संधी देणारा आणि एखाद्या विषयाला वाहिलेला कार्यक्रम असतो.
दुपारी १.०० वाजता लंच टाइम हे वार्तापत्र हे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातल्या बातम्या देणारे ३० मिनिटाचे वार्तापत्र प्रसारित केले जाते.
संध्याकाळी ६.३० वाजता स्पोर्ट्स टाइम हा क्रीडाविषयक कार्यक्रम होतो.
संध्याकाळी ७.०० वाजता महाराष्ट्राची बित्तंबातमी देणारे राज्याचे वार्तापत्र तर ८.०० वाजता मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांतल्या घडामोडींची नोंद ठेवणारे मुंबई-पुणे एक्सप्रेस हे वार्तापत्र प्रसारित केले जाते. रात्री ९.०० वाजता प्राइम टाइम हे राष्ट्रीय वार्तापत्र तर ११.०० वाजता ‘रात्रीच्या बातम्या’ हे दिवसभरातील सर्व घडामोडी सांगणारे बातमीपत्र प्रसारित होते.
शिवसेनाचा हल्ला [संपादन]
आयबीएन-लोकमत वाहिनीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकर्यांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ २० नोव्हेंबर, इ.स. २००९ रोजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयांवर हल्ला केला होता[१].
संदर्भ [संपादन]
- ↑ इन द नेम ऑफ देअर बॉस, सेना गुन्स अटॅक आयबीएन टीव्ही चॅनल्स. इंडियन एक्सप्रेस.कॉम (२१ नोव्हेंबर, इ.स. २००९). (इंग्लिश मजकूर)
|
|||||
