आमिर खान (गायक)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| आमिर खान (गायक) | |
|---|---|
| उपाख्य | सूररंग |
| आयुष्य | |
| जन्म | ऑगस्ट १५, इ.स. १९१२ |
| जन्म स्थान | भारत |
| मृत्यू | फेब्रुवारी १३, इ.स. १९७४ |
| मृत्यू स्थान | इंदूर, मध्य प्रदेश, भारत |
| व्यक्तिगत माहिती | |
| धर्म | मुस्लीम |
| नागरिकत्व | भारतीय |
| देश | |
| भाषा | मराठी |
| पारिवारिक माहिती | |
| वडील | शाहमिर खान (गायक, वीणावादक) |
| संगीत साधना | |
| गुरू | शाहमिर खान |
| गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
| घराणे | इंदूर घराणे |
| संगीत कारकीर्द | |
| पेशा | गायकी |
| गौरव | |
| गौरव | पद्मभूषण पुरस्कार संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार |
उस्ताद आमिर खान (मराठी लेखनभेद: आमिर खाँ ;) (१५ ऑगस्ट, इ.स. १९१२ - १३ फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील अतिशय विख्यात गायक कलावंत होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतविश्वात त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे आहे. त्यांनी इंदूर घराण्याची स्थापना केली.
अनुक्रमणिका |
[संपादन] पूर्वायुष्य व संगीत शिक्षण
आमिर खान यांचा जन्म भारतातील इंदूर या ठिकाणी संगीत कलावंतांच्या घराण्यात झाला. त्यांचे वडील शाहमिर खान हे भेंडीबझार घराण्याचे प्रसिद्ध सारंगीवादक व वीणावादक होते. ते इंदुरातील होळकरांच्या दरबारात आपली सेवा रुजू करत. त्यांचे आजोबा चंगे खान हे बहादूर शाह जफर यांच्या दरबारात गायक होते. अमीर खान यांची आई ते फक्त नऊ वर्षांचे असतानाच कालवश झाली. त्यांचे धाकटे बंधू बशीर हे ऑल इंडिया रेडियोच्या इंदूर स्टेशन येथे सारंगीवादक म्हणून रुजू होते.
आमिर खानांना त्यांच्या वडिलांनी सारंगीचे धडे दिले. परंतु त्यांची गायकीतील रुची पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना गायकीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यात त्यांनी मेरूखंड पद्धतीच्या गायकीवर जास्त भर दिला. अगदी कोवळ्या वयापासून अमीर खान यांचा वेगवेगळ्या पद्धतींच्या गायकींशी निकट परिचय होता, कारण इंदूरला भेट देणारे प्रत्येक संगीत कलावंत त्यांच्या घरी आल्यावाचून राहत नसत. घरी नित्यनियमाने संगीत मैफिली होत असत. आपल्या एका मामांकडून त्यांनी तबल्याचे धडेही घेतले.
[संपादन] संगीत प्रवास
इ.स. १९३४ मध्ये आमिर खान मुंबईला आले. तिथे त्यांनी काही संगीत कार्यक्रम केले आणि जवळपास सहा ध्वनिमुद्रिकांचे ध्वनिमुद्रण केले. वडिलांच्या सल्ल्यानुसार इ.स. १९३६ मध्ये ते मध्य प्रदेशाच्या रायगढ संस्थानच्या महाराज चक्रधर सिंघ यांच्या सेवेत रुजू झाले. अमीर खानांचे वडील इ.स. १९३७ मध्ये निवर्तले. त्यानंतर काही काळ खानसाहेब दिल्लीत तर काही काळ कोलकाता येथे राहिले. पण भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईत राहणे पसंत केले.
'सूररंग' या उपनावाने त्यांनी अनेक बंदिशींची रचना केली. त्यांची स्वतःची विशेष अशी गायकीची शैली होती. त्यांनी तराणा व पर्शियन मधील ख्यालयुक्त रचना पुढे आणल्या. ते अनेकदा झूमरा किंवा एकतालाचा वापर करत, तर बर्याचदा साथीला असलेल्या तबल्याचा साधा ठेका पसंत करत. त्यांचे सारंगीवादनाचे ज्ञान त्यांना गायकीच्या क्षेत्रात नाव कमावायला खूप उपयोगी पडले. जरी ते सारंगी वादनात कसलेले होते तरी त्यांनी साथीला बहुतेक वेळा तबला व तंबोराच वापरला. कधी कधी त्यांच्या साथीला मंद सुरांतील हार्मोनियमही असे. परंतु साथीला सारंगी त्यांनी क्वचितच वापरली.
[संपादन] चित्रपट क्षेत्रात पार्श्वगायन
जलशांमध्ये गाण्याखेरीज आमिर खान साहेबांनी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. बैजू बावरा, क्षुधितो पाषाण, शबाब, झनक झनक पायल बाजे हे त्यांतील महत्त्वाचे चित्रपट होत. गालिबवरील एका माहितीपटासाठी खानसाहेबांनी 'रहिये अब ऐसी जगह' ही गझलही गायली.
[संपादन] शिष्य
त्यांच्या शिष्यमंडळींमध्ये पंडित अमरनाथ, ए. कानन, श्रीकांत बकरे, सिंग बंधू, मुकुंद गोस्वामी, गजेन्द्र बक्षी, कंकणा बॅनर्जी, प्रद्युम्न कुमुद मुखर्जी व पूरबी मुखर्जी, हृदयनाथ मंगेशकर, अख्तर सादमनी, अमरजीत कौर, अजित सिंघ पेंटल, भीमसेन शर्मा, मुनिर खान व कमल बोस यांचा समावेश आहे.
[संपादन] पुरस्कार व गौरव
त्यांना इ.स. १९६७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविले गेले. इ.स. १९७१ मध्ये भारत सरकार ने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने भूषित केले.
[संपादन] संगीत तबकड्यांची यादी
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
चित्रपट
बैजू बावरा (संगीत दिग्दर्शक : नौशाद)
'तोरी जय जय कर्तार' (राग पूरिया धनाश्री)
'सरगम' (राग दरबारी)
'लंगर कंकरिया जी ना मारो' (राग तोडी, डी. व्ही. पलुसकरांसोबत)
'आज गावत मन मेरो झूमके' (राग देसी, डी. व्ही. पलुसकरांसोबत)
'घनन घनन घन गरजो रे' (राग मेघ)
क्षुधितो पाषाण (संगीत दिग्दर्शक : अली अकबर खान)
'कैसे कटे रजनी' (राग बागेश्री, प्रोतिमा बॅनर्जी यांसोबत)
'पिया के आवन की' (खमाज रागातील ठुमरी)
मेघ रागातील तराणा
शबाब (संगीत दिग्दर्शक : नौशाद)
'दया कर हे गिरिधर गोपाल' (राग मुलतानी)
झनक झनक पायल बाजे (संगीत दिग्दर्शक : वसंत देसाई)
शीर्षक गीत 'झनक झनक पायल बाजे' (राग अडाणा)
गूँज ऊठी शहनाई (बिस्मिल्ला खान यांचेसोबत रागमाला)
भटियार
रामकली
देसी
शुद्ध सारंग
मुलतानी
यमन
बागेश्री
चंद्रकंस
रागिणी
'जोगिया मेरे घर आये' (राग ललित)
सार्वजनिक व खासगी ध्वनिमुद्रिका
अभोगी
अडाणा
अहिर भैरव
अमीरखानी
बागेश्री
बागेश्री कानडा
बहार
बैरागी
बरवा
बसंत बहार
भटियार
भीमपलासी
बिहाग
बिलासखानी तोडी
चांदनी केदार
चंद्रकंस
चंद्रमधू
चारुकेशी
दरबारी
देशकार
गौड मल्हार
गुजरी तोडी
हंसध्वनी
हरिकंस
हेमकल्याण
बसंत मुखरी
हिंडोल बसंत
हिंडोल कल्याण
जयजयवंती
जनसंमोहिनी
जोग
काफी कानडा
कलावती
कौशी कानडा
केदार
कोमल रिषभ आसावरी
ललित
मधुकंस
मालकंस
मारु कल्याण
मारवा
मेघ
मियां मल्हार
मुलतानी
नंद
नट भैरव
पूर्वी
पूरिया
पूरिया कल्याण
रागेश्री
रामदासी मल्हार
रामकली
राम कल्याण
शहाना
श्री
शुद्ध कल्याण
शुद्ध सारंग
तोडी
यमन
यमन कल्याण