आजरा
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
आजरा (इंग्रजी: Ajara / Ajra) हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेले गाव आहे.
[संपादन] भूगोल
हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा) हे पर्यटनस्थळ येथून ३५ कि.मी. अंतरावर आहे, तर गोवा येथून ६० ते ७० कि.मी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हाची सीमा तर उत्तरेला भुदरगड, पूर्वेला गडहिंग्लज व दक्षिणेला चंदगड तालुका आहे
गावात रवळनाथाचे सुंदर मंदिर आहे येथून रामतीर्थ या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना एक रात्र राहिले होते अशी स्थानिक रहिवाश्यांची समजूत आहे. हे ठिकाण हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असून याठिकाणी पुरातन राम मंदिर आहे.
आजरा गावाची सध्याची लोकसंख्या १८००० हून अधिक आहे,त्यामुळे ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत करण्याची मागणी जोर धरत आहे. आजरा येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यापैकी अग्रेसर म्हणून रोझरी इंग्लिश हाय स्कूल चे नाव घेतले जाते.इथूनच जवळ गवसे जवळ प्रसिद्ध साखर कारखाना देखील आहे.महाराष्ट्र शासनद्वारा पुरस्कृत धरणाचे बांधकाम जवळच असलेल्या वेलवट्टी येथे हळोली परिसरात होत आहे. येथील आजरा घणसाळ तांदुळ प्रसिद्ध आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत ह्यांचे हे जन्मस्थान आहे.
आजरा पासून जवळच असलेली ठिकाणे :