आंतरराष्ट्रीय भूजल तज्ज्ञांची संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरराष्ट्रीय भूजल तज्ज्ञांची संस्था ही जगभरातील भूजल तज्ज्ञांमध्ये समन्वय साधून तंत्रज्ञानाचा प्रसार करणे या उद्दिष्टाने काम करणारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय इंग्लंडमध्ये असून, याची स्थापना १९५६ मध्ये झाली. या संस्थेमध्ये पाणी आणि पाण्याचा योग्य वापर याविषयी संशोधन करणारे तज्ज्ञ, पाणी व्यवस्थापन अभियंत्यांचा समावेश आहे. संस्थेमध्ये १३५ देशांतील ३८०० जल व्यवस्थापनातील तज्ज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेतर्फे भूजलाचे संवर्धन आणि त्याच्या योग्य वापराविषयी प्रबोधन आणि अभ्यास केला जातो.