अॅल गोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऍल गोर

हे अमेरिकेचे माजी उप-राष्ट्रपती होत. यांनी १९९७ ते २००१ या काळात क्लिंटन यांच्या राष्ट्रपती काळात उपराष्ट्रपतीपद भूषवले. २००१ च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी त्यांची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवड झाली. अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत जॉर्ज बुश यांच्याकडून थोडक्यात पराभव झाला. निवडणूक इतकी चुरशीची झाली की काही वाहिन्यांनी अॅल गोर जिंकल्याचे वृत्त दिले होते.

ॲल गोर यांनी १९७०च्या दशकापासून जागतिक तापमानवाढीवर लोकांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. त्यांनी आजवर जगभरात जागतिक तापमानवाढीवर अनेक देशांमध्ये व्याख्याने दिली आहेत व अजूनही देत आहेत. सर्व सामान्य व जास्तिजास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी २००७ मध्ये त्यांनी 'ॲन इनकव्हिनियंट ट्र्थ' हा माहितीपट काढला. या चित्रपटाला सर्वोतकृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. तसेच नोबेल प्रतिष्ठानने त्यांच्या कार्याची दखल घेउन २००८ चा शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल केले.

[संपादन] बाह्यदुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये