अशफाक उल्ला खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशफ़ाक उल्ला खान
Ashfaq Ulla Khan.2657.jpg
अशफ़ाक उल्ला खान वारसी 'हसरत'याचे चित्र
जन्म: १९००
मृत्यू: १९२७
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: नौजवान भारत सभा
कीर्ती किसान पार्टी
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन


अशफ़ाक उल्ला खान, (उर्दू: اشفاق اُللہ خان, इंग्रजी :Ashfaq Ulla Khan, जन्म:१९००, मृत्यु:१९२७) भारतीय स्वतन्त्रता संग्रांमाचे एक प्रमुख क्रान्तिकारी होते। त्यांनी काकोरी काण्ड मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली। ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर अभियोग चालवला आणि १९ डिसेम्बर सन् १९२७ ला त्यांना फैजाबाद जेल मध्ये फासावर लटकावून मारण्यात आले . राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते . त्यांचे उर्दू मध्ये तखल्लुस,ज्याला मराठीत उपनाम किंवा टोपण नाव म्हणतात , ते हसरत हे होते . उर्दू च्या व्यतिरिक्त ते हिंदी व इंग्रजीत सुद्धा कविता लिहित असत .त्यांचे पूर्ण नाव अशफ़ाक उल्ला खान वारसी हसरत असे होते . भारतीय स्वतन्त्रता संग्रामच्या संपूर्ण इतिहासामध्ये बिस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिन्दू-मुस्लिम एकतेचा एक अनुपम वृत्तांत आहे.

संक्षिप्त जीवन गाथा [संपादन]

अशफाक उल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील शहीदगढ शाहजहानपुर मध्ये रेलवे स्टेशन च्या जवळ स्थित कदनखैल जलालनगर मोहल्ल्यात २२ ऑक्टोबर १९०० ला झाला । त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद शफीक उल्ला खान होते । त्यांची आई मजहूरुन्निशाँ बेगम बला च्या सुंदर स्त्रियांमध्ये गणली जात असे । अशफाक यांनी स्वतः आपल्या डायरी मध्ये लिहिले आहे कि,जेथे एकीकडे त्यांच्या वडीलांच्या खानदानात एक हि स्नातक (ग्रेज्युएट) होई पर्यंतचे शिक्षण प्राप्त करू शकला नाही आणि एकीकडे त्यांच्या आजोळी सर्व उच्च शिक्षित होते .त्यांतील काही तर डिप्टी कलेक्टर व एस० जे० एम० (सब जुडीशियल मेजिस्ट्रेट) पदावर हि कार्यरत राहिले होते . १८५७ च्या गदर मध्ये त्या लोकांनी (त्यांच्या आजोळच्यांनी ) जेव्हा भारताची साथ नाही दिली ,तेव्हा इतर जनतेने रागाच्या भरात त्यांचा आलिशान बंगला आगीने भस्म करून टाकला . तो बंगला त्या पूर्ण शहरात जली कोठी (जळालेला बंगला) या नावाने प्रसिद्ध आहे .तरीही अशफाक यांनी आपले बलिदान देऊन त्यांच्या आजोळच्यांच्या नावावरील कुरूप डाग कायमसाठी धुऊन टाकला .

बिस्मिल यांच्याशी भेट [संपादन]

अशफाक आपल्या भावंडांत सर्वात लहान होते . सर्व प्रेमाने त्यांना "अच्छू " म्हणत असत . एके दिवशी त्यांचे मोठे भाऊ रियासत उल्ला यांनी अशफाक यांना बिस्मिल यांच्या बद्दल सांगितले कि ,"ते एक समर्थ व्यक्ती आणि उत्तम दर्ज्याचे कवी हि आहेत .गोया आजकाल मैनपुरी कांडामध्ये अटक झाल्या कारणाने शहाजहानपूर मध्ये दिसत नाही . खूप काळापासून देव जाणे कुठे आणि कोणत्या स्थितीत रहात असतील. बिस्मिल त्यांचा सर्वात उमदा क्लासफेलो आहे". अशफाक तेव्हा पासूनच बिस्मिल यांच्या भेटीसाठी उतावळे झाले। काळ पुढे लोटला । १९२० मध्ये आम मुआफी च्या नंतर राम प्रसाद बिस्मिल आपल्या गावी शाहजहानपुर मध्ये आले आणि घराच्या कारभारात मग्न झाले. अशफाक यांनी कित्येकदा बिस्मिल यांची भेट घेऊन त्यांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला ,पण ते असफल राहिले . एकेदिवशी रात्री खन्नौत नदीच्या किनारी सुमसाम जागेवर मीटिंग चालू होती तिथे अशफाक पोहोचले . बिस्मिल यांच्या एका चारोळी (शेर) वर जेव्हा अशफाक यांनी "आमीन" म्हटले तेव्हा बिस्मिल यांनी त्यांना जवळ बोलावून त्यांचा परिचय करून घेतला.बिस्मिल यांनी जाणून घेतले कि,अशफाक हे त्यांचे क्लासफेलो रियासत उल्ला यांचे सख्खे लहान भाऊ आहेत तसेच उर्दू भाषेचे शायर (कवी) आहेत, आणि बिस्मिल यांनी त्यांना आर्य समाज मन्दिरात येउन वैयक्तिक भेटण्यास सांगितले . घरच्यांचा विरोध असून देखील अशफाक आर्य समाजात पोहोचले आणि राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी खूप वेळच्या चर्चेनंतर त्यांच्या पार्टी मातृवेदी चे ऐक्टिव मेम्बर ( सक्रिय सदस्य ) हि बनले. येथूनच त्याच्या जीवनाची नवी कहाणी सुरु झाली. ते कवी तर होतेच, त्या बरोबरच ते देशासेवी हि बनले .