अळू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अळूची पाने

अळू (शास्त्रीय नाव : Colocasia esculenta, कलोकेशिया एस्क्युलेंटा ; इंग्लिश: Taro, टॅरो ;) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिकाआशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात.

अनुक्रमणिका

उपयोग [संपादन]

खाद्यपदार्थांमधील उपयोग [संपादन]

महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबर्‍याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पातरा म्हणतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अरवी असे नांव आहे.

भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत.


हेही पहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]