अरवल्ली पर्वतरांग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थान राज्याच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात आहे. जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये या पर्वतरांगेचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृश्ट्या अतिशय महत्वाची आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली.
राजस्थान गुजरात सीमेवरील माउंट आबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
हा पर्वत राजस्थान कडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरावली पर्वताच्या पूर्व भागात बर्यापैकी पाउस पडतो मात्र अरावलीच्या प्रभावामुळे पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवल्ली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून वन्य जीव वैविध्य व वन्यजीवांची संख्या लाक्षणीय आहे. रणथंभोर, सरिस्का, ही काही प्रसिद्ध जंगले अरावली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरेही अरावली पर्वताच्या सानिध्यात येतात. उदयपूर, चित्तोडगड, जयपूर, सवाई माधोपूर ही काही शहरे अरावलीच्या सानिध्यातील आहेत.
महाभारतातील मस्त्य देश हा अरावली पर्वतरागांमध्ये होता.

