अरल समुद्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अरल समुद्र Aral Sea स |
|
|---|---|
|
|
|
| स्थान | मध्य आशिया |
| गुणक: गुणक: | |
| प्रमुख अंतर्वाह | सिर दर्या |
| प्रमुख बहिर्वाह | - |
| पाणलोट क्षेत्र | १५,४९,००० वर्ग किमी |
| भोवतालचे देश | |
| पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | १७,१६० |
| कमाल खोली | १३८ |
| पाण्याचे घनफळ | २७ घन किमी (२००७ साली) |
अरल समुद्र (कझाक: Арал Теңізі; उझबेक: Orol Dengizi; रशियन: Аральскοе Мοре; ताजिक: Баҳри Арал; फारसी: |دریاچه خوارزم) हे मध्य आशियातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. अरल समुद्र पूर्णपणे बंदिस्त असून त्यामधून कोणताही बहिर्वाह होत नाही. अरल समुद्राच्या उत्तरेला कझाकस्तान व दक्षिणेला उझबेकिस्तान हे देश आहेत.
१९६०च्या दशकामध्ये सोव्हियेत संघाने अरल समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक असणारा अरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीस ह्या सरोवराच्या मुळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणी अस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. अरल समुद्राचे घटणे ही जगातील सर्वात भयंकर नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक मानली जाते.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |