अयोध्येचा राजा (चित्रपट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.
बाह्य दुवे [संपादन]
- अयोध्येचा राजा (चित्रपट) चित्रपटाविषयी माहिती. आय.एम.डी.बी.. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
