अमोल पालेकर
| अमोल पालेकर | |
टीच एड्ससाठी ध्वनिमुद्रण करताना अमोल पालेकर (इ.स. २००९) |
|
| पूर्ण नाव | अमोल कमलाकर पालेकर |
| जन्म | २४ नोव्हेंबर[१], इ.स. १९४४ मुंबई, ब्रिटिश भारत |
| कार्यक्षेत्र | अभिनय, दिग्दर्शन |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | मातृभाषा: मराठी अभिनय: मराठी, हिंदी |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. १९७१ -आजपर्यंत |
| प्रमुख चित्रपट | गोलमाल (हिंदी चित्रपट), रजनीगंधा |
| पुरस्कार | फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार (इ.स. १९७९) |
| वडील | कमलाकर पालेकर [२] |
| आई | सुहासिनी पालेकर [२] |
| पत्नी | संध्या गोखले |
| अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
अमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४; मुंबई, ब्रिटिश भारत - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत.[१]
अनुक्रमणिका |
[संपादन] कारकीर्द
पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली.
त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटासून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. [३].
इ.स. १९७४ मध्ये त्यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत. गोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला.
मराठी चित्रपट आक्रीत पासून त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट इ.स. २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.
त्यांनी आपला आवाज टीच एड्स या समाजसेवी संस्थेने तयार केलेल्या एड्ससाठीच्या शैक्षणिक संगणकप्रणालीत वापरला आहे. [४]
[संपादन] वैयक्तिक जीवन
अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पोस्टात काम करत असत आणि आई खाजगी कंपनी काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत[२]. अमोल पालेकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे[५][६][२] पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात.[७].
[संपादन] अमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके
मराठी:
- अवध्य
- आपलं बुवा असं आहे
- काळा वजीर पांढरा घोडा
- गार्बो
- गोची
- पार्टी
- पुनश्च हरि ॐ
- मी राव जगदेव मार्तंड
- मुखवटे
- राशोमान
- वासनाकांड
हिंदी :
- आधे अधुरे
- चूप कोर्ट चालू है
- पगला घोडा
- सुनो जनमेजय
- हयवदन
[संपादन] मानसन्मान
- २१ व २२ जानेवारी, इ.स. २०१२ या दोन दिवशी सांगली येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान अमोल पालेकरांना मिळाला होता.
[संपादन] पुरस्कार
- फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार - इ.स. १९७९ साली गोलमाल या चित्रपटासाठी.
[संपादन] रंगभूमीसाठी योगदान
अमोल पालेकर प्रायोगिक रंगभूमीसाठीच आपले बरेचसे योगदान दिले. व्यावसायिक रंगभूमीवर ते फारसे रमले नाहीत. अमोल पालेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटके केली. आपलं बुवा असं आहे, मुखवटे, मी राव जगदेव मार्तंड ही नाटके त्यांनी केली. दामू केंकरेंबरोबर काम करण्यासाठी आणि अनिकेत या त्यांच्या नाट्यसंस्थेला झालेले कर्ज फेडण्यासाठी पालेकरांनी आपलं बुवा असं आहे हे नाटक केले. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी बादल सरकार महोत्सव, विजय तेंडुलकर महोत्सव यासारखे महोत्सवही भरवले.
[संपादन] चित्रपटसृष्टीतील योगदान
[संपादन] अभिनेता म्हणून
[संपादन] अन्य भाषेतील चित्रपट
- मदर (बंगाली ) (सहकलाकार - शर्मिला टागोर आणि दीपंकर डे )
- कलंकिनी (बंगाली ) (सहकलाकार - ममता शंकर, दिग्दर्शक - धीरेन गांगुली )
- चेना अचेना (बंगाली ) (सहकलाकार - तनुजा आणि सौमित्र चटर्जी )
- कन्नेश्वर राम (कन्नड ) (सहकलाकार - अनंत नाग आणि शबाना आझमी – दिग्दर्शक - एम .एस .साठयू )
- पेपर बोट्स (कन्नड आणि इंग्रजी ) (सहकलाकार-दीपा, दिग्दर्शक - पट्टाभिराम रेड्डी )
- ओलंगल (मल्याळम ) (सहकलाकार - जयराम आणि अंबिका, दिग्दर्शक - बालू महेंद्र )
[संपादन] चित्रपटाच्या पडद्यावर गाजलेली गाणी(आवाज पार्श्वगायकाचा)
|
|
[संपादन] संदर्भ
- ↑ १.० १.१ 'आपल्यातीलच एक' थोडासा रूमानी झाला तेव्हा.... लोकसत्ता. “२४ नोव्हेंबर हा अमोल पालेकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचा याच कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.” (मराठी मजकूर)
- ↑ २.० २.१ २.२ २.३ अमोल पालेकर: बातों बातोंमें
- ↑ Chronology of Indian Cinema at upperstall
- ↑ "Star touch to animated film on HIV/AIDS".
- ↑ Silvers of the year.
- ↑ "Amol Palekar is back in action, this time with an English language ...".
- ↑ Amol Palekar at ibnlive
[संपादन] बाह्य दुवे
- अमोल पालेकर आय.एम.डी.बी. संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)