अमीष साहेबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमिष साहेबा या पानावरून पुनर्निर्देशित)

अमीश महेशभाई साहेबा (नोव्हेंबर १५, इ.स. १९५९:अमदावाद, गुजरात, भारत - ) हा भारतीय क्रिकेट पंच आहे. साहेबा गुजरातकडून रणजी करंडक स्पर्धेत फलंदाज म्हणूनही खेळला.

साहेबाने डिसेंबर १२, इ.स. २००८ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली.