अभिव्यक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अभिव्यक्ती म्हणजे विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करता येणे. व्यक्त करण्याची प्रेरणा ही प्रत्येक सजीवाला जन्मतः मिळालेली नैसर्गिक/दैवी देणगी आहे.

सजीवांचे एखादी गोष्ट व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्तीचे प्रकटीकरण करणे ; म्हणजे स्वतःच्या गुण अथवा अभिरूचीप्रमाणे एखादी गोष्ट एक किंवा अधिक माध्यमातून किंवा मार्गाने प्रकट करणे होय.[ संदर्भ हवा ] जीवनसंघर्षाची गरज,भावना,क्षमता,कला, या व्यक्त किंवा अविष्कारीत केल्या जाऊ शकतात त्याकरिता संवाद लेखन, विविध कलांची माध्यमे उपलब्ध होतात.जवळपास सर्वच सजीव कोणत्या न कोणत्या मार्गाने विविध गोष्टी व्यक्त करण्याकरिता अथवा अभिव्यक्क्तीचे प्रकटीकरण करण्याकरिता धडपडत असतात.

वनस्पतींना सुद्धा सभोवतीच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याकरिता तसेच कीटकांना आकर्षित करून घेण्याकरिता जीवनसंघर्षाची गरजम्हणून स्वतःचे रूप आणि गंध या मार्फत अभिव्यक्त व्हावयास लागते.मनुष्येतर प्राणी मात्र सभोवतीच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याकरिता तसेच विरुद्ध लिंगी सजीवास आकर्षित/प्रभावित करण्याकरिता जीवनसंघर्षाची गरजम्हणून स्वतःचे रूप,आवाज, स्पर्श आणि गंध या मार्फत अभिव्यक्त होतोच त्या शिवाय स्वतःच्या भाव भावनांची जाणीव स्व-समूहात देण्याकरिता आवश्यक संवादाची निर्मितीही करू शकतो.

इतर प्राणीमात्रांपेक्षा मानवात शरीररचनेसुद्धा विचारक्षमता,.., वैशिष्ट्ये आणि भाषा,..., कौशल्ये अधिक आढळतात जी त्याला आपले आचार,विचार, भाव भावना आणि आशय माध्यमे,साधने आणि तंत्र सहाय्याने प्रकट करण्यास सहाय्यभूत ठरतात.यामुळे मानवी जीवनातील, व्यक्तींच्या, कुटुंबाच्या, समूहांच्या संस्कृती,कायदा,शासनप्रणाली अशा असंख्य जीवनप्रणालींवर मानवी अभिव्यक्ती अभिव्यक्त करण्याच्या क्षमतेचा परिणाम होत असतो.

आनंद, खेद, दुःख, प्रेम, भावना, मत, विचार, शोक, हर्ष इत्यादी व्यक्त करणे म्हणजे, मनात असलेल्या या भावना शब्दरूपात उघड करणे. या गोष्टी हेतुपूर्वक केल्या नाहीत तरी त्या नजरेतून, वागणुकीतून किंवा चेहऱ्यावरील भावमुद्रांनी व्यक्त होऊ शकतात. औदासीन्य, कारुण्य, क्रौर्य, जिव्हाळा असल्या काही गोष्टी व्यक्त करता येत नाहीत, तर त्या फक्त व्यक्त होतात. तर सुख, शौर्य असल्या गोष्टी ना व्यक्त करता येत ना होत.[ संदर्भ हवा ]

अभिव्यक्तीची सूप्त अवस्था[संपादन]

विचारांचे अस्तित्व आभासी (virtual entity) असते. भौतिक जगात विचाराला आकार (size-shape-form) नाही. तो माध्यमातून प्रकट व्हावा लागतो. मग ते माध्यम लेखन असेल, चित्र - रंग असतील - गायन असेल, किंवा बॅटमिटंटन (badminton) खेळणंही असू शकेल. एखादी व्यक्ती जे काही करते ते तिच्या विचारांचं भौतिक स्वरूप असतं. विचारांचं सौंदर्य - कुरुपता किंवा अभाव[१] सुद्धा आचरणातून समोर येतो. एखाद्याचे विचार अनेकांच्या विचारांना चालना देतात. आणि मग orchestra सारखी harmony साधली जाते, किंवा दुसऱ्या टोकाला महायुद्धासारखी भीषणताही ! भौतिक जगापासून प्रेरणा घेत विचारांना प्रभावी बनवलं जातं. वयाबरोबर येणारं शहाणपण हे याचंच उदाहरण आहे. काही वेळा विचारांना दडवलं जातं, मुखवटा घातला जातो. समज-गैरसमजांच्या भानगडी निर्माण होतात. प्रश्न-उत्तराच्या श्रुंखलाही ! विचार, वाणी आणि कृती, या क्रमाने , आपल्या या अभिव्यक्ती, बहिर्मुख होत जातात .[२]

मानस शास्त्रीय विश्लेषण[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



मानसविश्लेषणात neurotic inhibitions and/or symptoms पासुन स्वातंत्र्य हे साद्य असते, उत्स्फूर्तपणे व्यक्त होण्याचे स्वांतत्र्य एखाद्यास देणे ही पद्धत असते.

in the case of psychoanalysis, freedom from neurotic inhibitions and/or symptoms is the goal, and the freedom to express oneself spontaneously to the analyst is the method.[३]

अव्यक्त/ व्यक्त[संपादन]

भारतीय तत्त्वज्ञानानुसार सृजन/निर्मिती प्रक्रियेत अव्यक्त व्यक्त होत असते.अव्यक्ताला सुद्धा अव्यक्त स्थितीतील अभिव्यक्तीचे अस्तित्व असते जे अव्यक्त अवस्थेतून सुयोग्य परिस्थितीत व्यक्त होण्यास उत्सुक असते तर ते कधी व्यक्त न होऊ शकल्यामुळे अस्वस्थ असते,तर कधी बाह्य परिस्थितीची तमा न बाळगता व्यक्त होते.भारतीय तत्त्वज्ञानानुसार अव्यक्ताचे आणि व्यक्त कडे आणि अव्यक्त कडे जाणे ही सततची प्रक्रिया आहे,[४][५][६] या प्रक्रीयेचा संबंध भारतीय तत्वशास्त्र रससिद्धांताशी (कला) आणि जन्म आणि पुर्नजन्माच्या चक्राशी जोडते.[ संदर्भ हवा ]

भारतीय तत्त्वज्ञानातील प्रवृत्ती आणि निवृत्ती या विचारधारा व्यक्त आणि अव्यक्ताच्या विश्लेषणाने प्रभावित झालेल्या दिसतात. याचा दूरगामी परिणाम भारतीय जीवन आणि संस्कृतीच्या मनोभूमिका घडण्यावर झाल्याचे आढळून येते.जन्म आणि पुर्नजन्माच्या चक्रातून सुटका होण्याचा उपाय मोक्ष आणि तो साध्य करण्याचा उपाय केवळ कर्तव्य म्हणून प्रवृत्तीचा स्विकार पण मनाने निवृत्तीपर तत्वज्ञानाचा स्विकाराकडे अधिक कल हे पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप असल्यामुळे प्रवृत्तीचा स्विकार करताना अभिव्यक्तीचा स्विकार होत असला तरी भारतीय तत्त्वज्ञानात सहसा निवृत्तीपर तत्त्वज्ञानास अधिक महत्त्व दिले गेल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यास पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञान स्विकारत जरी असलं तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आग्रही असल्याचेही आढळत नाही.[ संदर्भ हवा ]

व्यक्त आणि अभिव्यक्ततील साम्य आणि भेदः
व्यक्त शब्दाच्या पूर्वी येणारा अभि संस्कृत उपसर्ग एखाद्या गोष्टीची विशेषता दाखवण्याकरता वापरला जातो.अभिव्यक्त शब्दाचा अर्थ शाब्दबंधनुसार स्पष्ट रूपात समोर आलेला अथवा प्रकट केला गेलेला व्यक्त केलेला, जाहीर केलेला, उघड केलेला, अनावृत केलेला असा होतो.


व्यक्त होणे हे अभिव्यक्त होण्याचा भाग आहे त्यामुळे एका अर्थाने प्रत्येक व्यक्त होणे हे अभिव्यक्त होणे ठरते,पण आशयाची अभिव्यक्ती या दृष्टीने विचार करावयाचा झाला तर अभिव्यक्त होणे निव्वळ व्यक्त होण्यापेक्षा काही विशेष प्रभाव ठेवणारे,ऊठून दिसणारे असते ज्यामुळे अभिव्यक्त आशयास बौद्धिक मुल्य प्राप्त होते,आशयाचे बौद्धिक मुल्य स्विकारवायाचे का नाही आणि स्विकारले तर त्याचे मूल्यांकन आशय प्राप्त करणाऱ्या व्यक्ती, समूह किंवा संस्थेवर अवलंबून असते.

आशय अभिव्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या इतरांना प्रभावित करण्याच्या किंवा धनैषणा इच्छेमुळे, अभिव्यक्त होण्याचे कौशल्य बऱ्याचदा सामाजिक/राजकीय बांधिलकी अथवा मनोरंजनाकरिता वापरले जाते, तर काहींच्या बाबतीत अभिव्यक्त होणे हे स्वतःच्या अभिव्यक्त होण्याच्या आणि करण्याच्या पुरतेच असते यातून कलेकरिता कला समाजाकरिता कला आणि मनोरंजनाकरिता कला से भेद आणि वादविवाद होतात.

व्यक्त/अभिव्यक्त होणाऱ्या व्यक्तिंचे व्यक्त/अभिव्य्क्त होणे स्वस्वभाव, स्वगुणधर्म, काळ वेळाची उपलब्धता धनैषणा कुटूंबात,समूहात,प्रदेशात रहाण्याची गरज आणि तेथील तत्कालीन संस्कृतीची-कायदा-समाजव्यवस्था-शासनव्यवस्थेच्या स्विकार्हता इत्यादींनी प्रभावित होण्याची शक्यता असते.काही वेळा अभिव्यक्तीचे बौद्धिक मुल्य चांगले असूनही,अभिव्यक्त्याच्या स्वतःच्या माघार घेण्यामुळे किंवा तत्कालीन कुटूंब,समुह संस्कृतीची-कायदा-समाजव्यवस्था-शासनव्यवस्थेच्या कुटूंबात,समूहात,प्रदेशाचा त्यावर-किंवा त्याच्या इतर समाजावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव असल्यामुळे ,किंवा स्व-बंधनांमुळे अभिव्यक्ती दुर्लक्षित/ नाकारली /विरोधली जाऊ शकते .

अभिव्यक्त्याची प्रत्येक अभिव्यक्ती स्विकारली/दुर्लक्षित/ नाकारली /विरोधली जाणे हे अभिव्यक्त्याची स्वतःच्या प्रभाव कौशल्यांवरही, प्रबळ ईच्छाशक्तीवरही अवलंबून असते यामुळे एखादा नवीन आचार-विचार नाकारला जाणे अथवा स्विकारला जाणे असे होऊ शकते. प्रभावी अभिव्यक्ता एखादी विशिष्ट बाजूचे समर्थन प्रभावीपणे करत असेल तर दुय्यमसुद्धा महत्त्वाचे भासू शकते,काही प्रभाव काल सापेक्ष तर काही काल निरपेक्ष ठरतात.

अभिव्यक्त होताना एखादी विशिष्ट अभिव्यक्ती किंवा अभिव्यक्त होणारी व्यक्ती त्या प्रकारची शेवटचीच आहे असे जाहीर करत काही अभिव्यक्ते अभिव्यक्त होतात किंवा अभिव्यक्त्याने तसे न करण्याचा सल्ला देऊनही त्याचे अनुयायी तसे करत राहू शकतात यामुळे व्यक्तीप्रामाण्य,ग्रंथप्रामाण्य,मूर्तीप्रामाण्यला समाज स्विकारतो.तर बुद्धीप्रामाण्यवाद या मानवी प्रवृत्तीस अंधानुकरण मानतो.

धार्मिक संकल्पना[संपादन]

भारतीय निवृत्तीपर तत्वज्ञानाचे विश्लेषण मान्य करावयाचे झाले तर अव्यक्तसुद्धा अभिव्यक्त होत असते,निराकार निर्गुण ईश्वरसुद्धा स्वतःला अविष्कारत असतो, परलोकैषणा प्राणैषणा.

बुद्धीचा ‘विवेक’ हा मुख्य गुण आहे.

सुरेश्वराचार्य आपल्या नैष्त्कर्म्य सिद्धींत (१४, ४) म्हणतात -

बुद्धौ एव विवेकोऽयम यत् अनात्मतया भिदा

बुद्धिमेव उपमृद्गाति कदलीं तत्फलं यथा।।

अर्थ: विवेक हा बुद्धींत अभिव्यक्त होतो. बुद्धि हे अनात्म तत्त्व आहे. बुद्धि म्हणजे आत्मा नव्हे हे खरे; पण अनात्मबुद्धीचा नाश करणारा विवेक बुद्धीतच प्रकट होतो व बुद्धीचा उपाधि, विवेकाच्या उदयानंतर आपोआप अस्तंगत होतो. केळीला फळे आली व ती पूर्ण पक्व झाली की स्वतः केळीचे झाड नष्ट होत असते.[७]

श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जूनास सांगतात:-

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।

अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २-२८ ॥

अर्थ: हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अव्यक्त असतात आणि मेल्यानंतरही अव्यक्त होणार असतात. फक्त मध्ये (जिवंत असताना) व्यक्त असतात. (मग अशा स्थितीत शोक कसला करायचा.) ॥ २-२८ ॥ [८]

जीवनविद्येने केलेली पाप-पुण्याची व्याख्या[संपादन]

जीवन विद्या मिशन बरी-वाईट क्रिया आणि त्याची अव्यक्त इष्ट-अनिष्ट प्रतिक्रिया या दोहोंच्या दरम्यान आपल्या क्रियेचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपाने अंतर्मनात वास करून असतो व अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची व संधीची वाट पहात तेथे ठाण मांडून बसतो, तो सूक्ष्म ठसा म्हणजे पुण्य किंवा पाप होय.

जैन दृष्टीकोण[संपादन]

सुफी दृष्टीकोण[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


in Sufism and Qur`anic wisdom is called "the Return." There is an ayat (line) from the Qur`an that says, Inna lillahi wa inna ilaihi rajiuun. This means, From Allah do all things come and unto Allah do all things return.[९]

माध्यमे,साधने आणि तंत्र[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


how to appropriately present oneself to others:manifestations embody specific functions and meanings: to allow for individual expression, to allow a community-based culture to express itself through direct and popular (in the sense of “from the people”) appropriation, to create the space for this culture to transform and develop itself, and to incarnate real-life social ideals that can be shared through [१०] .मनातला आशय माध्यमातून अभिव्यक्त होताना तंत्राच्या शुद्धतेने गुदमरून जाऊ नये.

स्वरभाषा[संपादन]

स्वरभाषा ही भावार्थसौंदर्याची अभिव्यक्ती असते. मनाच्या अनेकविध अवस्थांचे अनेकविध रंग ही स्वरभाषा अभिव्यक्त करत असते.ज्ञानेश्वरीत परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत. परा म्हणजे नाभीतली अव्यक्त वाणी आणि वैखरी म्हणजे प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी. परा, म्हणजे खरे तर नेणीवेत विचार येतो तेव्हाच आपण स्वतःशी बोलतो. प्रत्यक्ष बोलतो तेव्हा दुसऱ्याशी अभिव्यक्त होतो आणि कृती म्हणजे आपले बोलणे समष्टीशी. विचार, वाणी आणि कृती, या क्रमाने, आपल्या या अभिव्यक्ती, बहिर्मुख होत जातात .

साहीत्य[संपादन]

अभिव्यक्त होणे ही माणसाची गरज आहे. परंतु साहित्यामधून तो जेव्हा अभिव्यक्त होतो. तेव्हा सहाजिकच त्याच्या व्यक्तिमत्वातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक कंगोरे व्यक्त होत जातात.[११]

मुलभूत स्वातंत्र्ये[संपादन]

मुक्तपणे अभिव्यक्त होण्याकरता व्यक्तींना जसे पोषक कौटूंबिक सामाजिक आर्थिक वातावरण सहाय्यभूत होऊशकते त्याचप्रमाणे समाजाने/कायद्याने विविध प्रकारची स्वातंत्र्ये उपलब्ध करून दिल्यास स्वपरिपूर्तीची अनुभूती घेता येते.

अव्यक्तझालेली आणि संधी नाकारलेले गेलेले किंवा बंधनात असलेले गट[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


(अनरिप्रेझेंटेड) "आवाज म्हणजे एखाद्या व्यक्तिस स्वतःचे मन आणि स्वतःची इच्छा व्यक्त करण्या करिता क्षमता, साधने आणि अभिव्यक्त होण्याचा अधिकार उपलब्ध असणे . जर एखाद्या व्यक्तिकडे ही साधने किंवा अधिकार उपलब्ध नसतील ती व्यक्ती चूप असते.

"voice means having the ability, the means, and the right to express oneself, one's mind, and one's will. If an individual does not have these abilities, means, or right, he or she is silent" [१२]

स्रोतः

  1. http://heinonline.org/HOL/LandingPage?collection=journals&handle=hein.journals/hlr104&div=22&id=&page=

अभिव्यक्त होणे स्वतः होऊन टाळणे[संपादन]

अभिव्यक्त व्यक्त होण्याची प्रेरणा स्वाभविक असली तरी व्यक्ती विविध कारणांनी अभिव्यक्त होणे किंवा अभिव्यक्त होण्याची गरज सांगणे टाळत असताना आढळतात.व्यक्ती काहीवेळा सभोवताली पोषक वातावरणाचा/प्रोत्साहनाचा/इतर आर्थिक प्राधान्ये इतर असळ्यामुळे/वेळेचा अभाव ,संवेदनेचा अभाव, इतर कौटूंबीक व्यक्ती/ सामाजिक/समूहाच्या संभाव्य किंवा वास्तव प्रतिकुल प्रतिक्रीयेचे दडपण,नकारत्मकता टाळण्याचे किंवा सतत उपस्थित कामात गतीरोध येऊनयेत किंवा कौटूंबीक सामाजिक किंवा व्यावसायिक शासकीय बंधने व्यक्तिगत पातळीवरील नैतिक समजूती आणि बंधने कौशल्यांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे व्यक्त होणे टाळत असताना आढळतात.

स्वांतंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार आहे ह्या लोकमान्यांच्या वाक्यातील तत्त्वाबद्दल नरहर कुरुंदकर स्वांतत्र्य हे संस्कृती सिद्ध म्हणजे ते वापरून किंवा त्याच्या कक्षा वाढवण्याकरिता झगडून प्राप्त करावे लागते अशी शंका व्यक्त करतात.

अभिव्यक्त होण्यातील मर्यादा[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


डिसेंबर २००३ च्या जिनेवा आणि नोव्हेंबर २००५ च्या ट्यूनिस मध्ये झालेल्या आधूनिक माहिती आधारीत समाज (Information Society [मराठी शब्द सुचवा]) वरच्या जागतिक परिषदेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि माहितीची उपलब्धता हे सर्वाधिक चर्चा झालेलेले 'अधिकार' विषय होते काही जणांनी हे अधिकार आधूनिक माहिती आधारीत समाजाचा (Information Societyचा) गाभा असल्याचे मांडले , तर इतरांनी ज्या जगात बहूसंख्य लोकांपर्यंत माहिती तंत्रज्ञान पोहोचलेले नाही ,-आणि “संवादांचे परिघ” पाश्चात्य/अमेरिकन संस्कृती ,मजकुर, माध्यमे आणि इंग्रजी भाषेकरिता मर्यादित आहेत-, तीथे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि माहितीची उपलब्धता प्रत्यक्ष उपयूक्तता मूल्य नसलेले केवळ एक औपचारिक प्रमाण असेल असा आरोप केला.

Freedom of expression and access to information was one of the most debated rights during the negotiations leading up to the World Summit on the Information Society held at Geneva in December 2003, and at Tunis in November 2005. This right was praised by some as the very core of the information society, and accused by others of being a merely formal stan- dard with little practical reality in a world where the majority of the pop- ulation does not have access to information technology and in which the “communication sphere” is dominated by Western/American culture and content, media concentration, and the English language.[१३]

हेसुद्धा पाहा[संपादन]

लेखात प्रयुक्त संज्ञा[संपादन]

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा[संपादन]

प्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा
3 4

इंग्रजी मराठी संज्ञा[संपादन]

appropriately present oneself समुचित (सुयोग्य) पद्धतीने बाजू मांडणे
manifestations embody अभिव्यक्तिस मूर्त स्वरूप देणे
popular appropriation लोक...
transform मराठी
incarnate मराठी
अनरिप्रेजेंटेड मराठी
virtual entity आभासी अस्तित्व
specific functions मराठी
merely formal standard मराठी
badminton मराठी
absence मराठी
मग orchestra सारखी harmony साधली जाते मराठी
incarnate real-life social ideals मराठी
creativity सर्जनशीलता
cognition १ बोध (पु.) २ बोधन (न.) ३ बोधावस्था (स्त्री.)
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://ssubbanna.sulekha.com/blog/post/2007/10/human-expression-words-sounds-and-silence.htm Archived 2008-01-11 at the Wayback Machine. दिनांक ४ एप्रील २०११ भाप्रवे सकाळी ७ वाजता जसे दिसले
  2. ^ संदर्भ:प्रेम -संजय भास्कर जोशी(कादंबरीकार आणि समीक्षक) 20 Sep 2010, 0320 hrs IST महाराष्ट्र टाईम्स
  3. ^ D Lichtenstein - American Imago, 1993 - pep-web.org गूगल स्कॉलरशोधवर ४ फेब्रू २०१० मर्यादित दिसलेले वाक्यवरून
  4. ^ अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत। अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥२- २८॥ भगवत गीता
  5. ^ जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें । मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥१६४॥ तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥१६५॥- ज्ञानेश्वरी भावार्थ दिपिका
  6. ^ Health Harmony Through Ayurveda By Anil K. Mehta, N.K. Gupta, R. N. Sharma Gppfle books vara 14 march 2011 bhaapra ve ratrau 1 vajta jase disle
  7. ^ Google's cache of http://www.maharshivinod.org/node/843. It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 21:34:00 GMT.
  8. ^ श्रीमद्‌भगवद्‌गीता_:_दुसरा_अध्याय_(सांख्ययोग) २-२८ (विकिस्रोत आवृत्ती:विकिस्रोत, . १९ एप्रि. २०१४, १०:३५ UTC पासून Retrieved ०६:५७, जून ३०, २०१५ मिळवीले)
  9. ^ Returning:P.R. Sarkar's Model of The Six Spokes of Progressive Development From Divine Remembrance ~ Winter 2002/Spring 2003 Sheikh Din Muhammad Abdullah al-Dayemi . हे संकेतस्थळपान दिनांक ४ एप्रील भाप्रवे सकाळी ९.३० वाजता जसे दिसले.
  10. ^ G o o g l e's cache of http://journal.lib.uoguelph.ca/index.php/csieci/article/viewArticle/382. G o o g l e's cache is the snapshot that we took of the page as we crawled the web.
  11. ^ [Google's cache of http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-6-01-06-2009-311c4&ndate=2009-06-01&editionname=maharashtra[permanent dead link]. डॉ. नरेंद्र जाधव] It is a snapshot of the page as it appeared on 18 Jan 2010 12:26:11 GMT.
  12. ^ (Reinharz, 1994, p. 180)I Prilleltensky, L Gonick - Political Psychology, 1996 - jstor.org
  13. ^ [This is the html version of the file http://www.nccr-trade.org/images/stories/mira/ict_freedom%20of%20expression.pdf[permanent dead link]. 1 The Right to Express Oneself and to Seek Information-Rikke Frank Jørgensen]

नोंदी[संपादन]