अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अब्दुल्ला २ बिन अल-हुसेन (जन्म: ३० जानेवारी १९६२, अम्मान) हा
जॉर्डन देशाचा राजा आहे. त्याचे वडील राजे हुसेन ह्यांच्या मृत्यूनंतर ७ फेब्रुवारी १९९९ रोजी तो जॉर्डनचा राजा बनला. अब्दुल्ला हा मुहम्मद पैगंबराचा ४३वा वंशज मानला जातो.
राजा अब्दुल्लाने इंग्लंड व अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. त्याने रानिया अल-यासिन ह्या महिलेशी १९९३ साली लग्न केले व त्यांना ४ अपत्ये आहेत.