अबुल फझल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शेख अबुल फझल इबने मुबारक(१४ जानेवारी १५५१-१२ ऑगस्ट १६०२) (उर्दू:ابو الفضل) अकबरकाळातील मोगल वजिर होते. ते अकबराच्या नवरत्नातील एक व्यक्ती मानले जातात.यांना अबु'ल फझल, अबु'ल फद्ल अने अबु'ल फद्ल 'अल्लामि नावानेही ओळखले जाते. त्यांनी "अकबर नामा" नामक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, अकबराच्या राज्याचा अधिकृत इतिहास ही त्यांनी तीन भागात लिहिला. हा ग्रंथ "ऐने अकबरी" म्हणून विख्यात आहे. याशिवाय त्यांनी बायबल चा फारसीत अनुवादही केला.
[संपादन] चरित्र
अबुल फझल सिंधनां शेख मुसाचा पांचवे अपत्य होत. अबुल फझल यांचा जन्म आग्रा येथे झाला. ते अकबराच्या राजदरबारात १५७५ मध्ये दाखल झाले व दक्षिणेतील युद्धात मुघल शाही सेनाचे नेतृत्व केले. अकबराच्या उदार धार्मिक विचारांवर अबुल फझल यांचा प्रभाव होता.
ते मुघल शाहजादा सलीम(जहांगीर)च्या राज्यारोहणाविरुद्ध होते. या कारणाने १६०२ मध्ये मुघल राजपुत्र सलीमद्व्रारा रचलेल्या कटात विरसिंह बुंदेला(जे नंतर ओरछाचे राजे बनले) यांनी 'सराइ विर' व 'आंत्री'(नरवार) जवळ हत्या केली. त्यांचे शिर जहांगीरकडे पाठवण्यात आले होते. नंतर १६०८ मध्ये जहांगीर द्वारा त्यांचे पुत्र शेख अब्दुर रहेमान अफझल खान यास बिहारचे सुभेदार बनवले.