अतुल पेठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अतुल पेठे
जन्म अतुल पेठे
१४ जुलै, १९६४ (1964-07-14) (वय: ५९)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
अपत्ये पर्ण पेठे (मुलगी)

अतुल सदाशिव पेठे (जन्म : १४ जुलै १९६४) हे एक मराठी नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यप्रशिक्षक, आरोग्यसंवादक व नाट्यदिग्दर्शक आहेत.

विशेष[संपादन]

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, छायाचित्रकार, माहितीपटकार, निर्माता, प्रशिक्षक अशीही अतुल पेठेंची ओळख आहे. त्यांची विचारशील प्रायोगिक नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत गाजली. १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवर जोरकसपणे काम करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. ज्या नाटक करायला अवघड होते, अशा काळात त्यांनी हिमतीने महाराष्ट्रभर स्वतःचे नाटक नेले. त्यावर चर्चा झाल्या आणि नवे नाटक पुन्हा रुजले गेले. त्यांनी अनेक नाट्यकार्यशाळा घेतल्या. त्यांतून नवे रंगकर्मी तयार झाले. आशयघन नाटके हा त्यांचा विशेष आहे.

नाट्यगट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच पेठे त्यांचे नाट्यप्रयोग घडवून आणतात. ते नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतात. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून ‘आरोग्य-संवाद’ या संकल्पनेवर काम करणारे महाराष्ट्रात अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अतुल पेठे यांनी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे अशा समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करून हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशत असा विषयांवरची नाटके अतुल पेठे यांनी स्वीकारली आणि सादर केली. त्यांना या मार्गाने वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत.

  • ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले.
  • ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचे नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले.
  • कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजाराच्या आसपास प्रयोग झाले.

'रंगधर्मी'हे विशेषण विशेष गांभीर्याने लावता येईल अशी फार थोडी माणसे मराठी नाट्यसृष्टीत आहेत, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे अतुल पेठे. १९९० नंतरच्या तीन दशकांत त्यांनी किती विविध प्रकारची नाटके रंगमंचावर आणली आणि त्यांच्या उभारणीतही किती वैविध्य आहे, यावर दृष्टिक्षेप टाकला तर कोणीही जाणकार नाट्यप्रेमी चकितच होईल. त्यातही विशेष हे आहे की, नाट्यसृष्टीत नाव कमावलेल्या व यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहानथोरांना मोह व्हावा किंवा त्यांनी प्रलोभनाला बळी पडावे असे दृकश्राव्य माध्यमातील कितीतरी पर्याय मागील तीन दशकांत उपलब्ध झालेले आहेत. तरीही अतुल पेठे नाटकच करतात. त्याचे कारण सांगताना ते असे म्हणतात की, "टीव्ही माणसाला आहे त्यापेक्षा लहान दाखवतो, सिनेमा माणसाला आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो, नाटक मात्र माणसाला आहे तेवढाच दाखवते.

अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

  • आनंदीगावचा गंमतराव (बालनाट्य)
  • दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य)
  • चेस
  • पाऊस आता थांबलाय
  • मंथन
  • यात्रा
  • अंक दुसरा
  • आविष्कार
  • गाणे गुलमोहोराचे
  • डायरीची दहा पाने
  • शोध अंधार अंधार
  • क्षितिज
  • अवशेष
  • शीतयुद्ध सदानंद (श्याम मनोहरांच्या कादंबरीचे
नाट्यरूपांतर)
  • दलपतसिंग येती गावा (सहलेखक)

अतुल पेठे यांची भूमिका असलेली आणि दिग्दर्शित केलेली नाटके[संपादन]

  • चेस (एकांकिका)
  • पाऊस आता थांबलाय
  • मंथन
  • क्षितिज
  • सापत्‍नेकराचे मूल
  • पडघम
  • प्रलय
  • अतिरेकी
  • घाशीराम कोतवाल
  • वेटिंग फॉर गोदो
  • शीतयुद्ध सदानंद
  • प्रेमाची गोष्ट ?
  • मी जिंकलो - मी हरलो
  • ठोंब्या
  • गोळायुग
  • सूर्य पाहिलेला माणूस
  • समाजस्वास्थ्य
  • किमया (अभिवाचन)
  • तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य
  • परवा आमचा पोपट वारला
  • रेड रेबिट व्हाईट रेबिट
  • शब्दांची रोजनिशी
  • ताल-भवताल
  • अडलंय का ?
  • Confessions

==अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके आणि प्रयोग

  • चेस (५०)
  • डायरीची दहा पाने (२५)
  • क्षितिज (१५)
  • शीतयुद्ध सदानंद (११)
  • बसस्टॉप (२५)
  • मामका:पांडवाश्चैव (२५)
  • वळण (१०)
  • टॅक्स फ्री (१०)
  • शीतयुद्ध सदानंद (५०)
  • वेटिंग फॉर गोदो (४५)
  • ऐस पैस सोयीने बैस (२५)
  • प्रेमाची गोष्ट ? (७७)
  • सूर्य पाहिलेला माणूस (१००)
  • आनंदओवरी (७०)
  • उजळल्या दिशा (६५)
  • चौक (सहदिग्दर्शक - मकरंद साठे)(३८)
  • गोळायुग (४)
  • मी ... माझ्याशी (४०)
  • दलपतसिंग येती गावा (२०)
  • सत्यशोधक (११८)
  • सत्यशोधक (कन्नड)(७५)
  • आषाढातील एक दिवस (७७)
  • तर्कांच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य (५२)
  • प्रोटेस्ट(१)
  • समाजस्वास्थ्य (७८)
  • किमया (४०)
  • परवा आमचा पोपट वारला (४८)
  • शहर - तूट के क्षण (४)
  • शब्दांची रोजनिशी (५९)
  • ताल-भवताल (६)
  • MallPractice and the show (२०)
  • बिगडे बिम्ब (६)
  • Confessions (१)

अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट[संपादन]

  • कथा दोन गणपतरावांची
  • कलाकार
  • म्हादू
  • यकीन मानो

आत्मचरित्रवजा आठवणी आणि अन्य लेखन[संपादन]

  • चेस आणि इतर एकांकिका
  • नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)
  • रिंगणनाट्य (सहलेखक : राजू इनामदार)

इतर कामे :

  • कोसला (दिग्दर्शन,आकाशवाणी पुणे केंद्र २५ भाग)
  • हिंदू (वाचन स्टोरीटेल)
  • रिपोर्टिंगचे दिवस (वाचन स्टोरीटेल)
  • अज्ञात गांधी (वाचन स्टोरीटेल)
  • रानमित्र (वाचन स्टोरीटेल)
  • कुतूहलपोटी (वाचन स्टोरीटेल)
  • समांतर, रंगवाचा या नाट्यविषयक मासिकांचे संपादक मंडळात सहभाग
  • रंगसंगत नाट्यकार्यशाळेचे आयोजन.
  • नाटकघरतर्फे नाट्यप्रयोग आयोजन.
  • 'मानसरंग'नाट्य संकल्पना आणि नाट्यमहोत्सव

अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • पुरुषोत्तम करंडक - केशवराव दाते अभिनय नैपुण्य पुरस्कार
  • पुरुषोत्तम करंडक - गो.गं. पारखी लेखन पुरकार
  • नाट्यदर्पण - अरविंद देशपांडे दिग्दर्शन पुरस्कार - शीतयुद्ध सदानंद
  • रंगदर्पण गजानन सरपोतदार पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक आणि संगीत - उजळल्या दिशा
  • सत्यशोधक पुरस्कार - पुणे म न पा कामगार युनियन
  • डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र फौंडेशनचा नाट्यगौरव पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा के.नारायण काळे पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा मो.ग.रांगणेकर पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार
  • अखिल भारतीय नाट्य परिषदेचा चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार
  • प्रमोद कोपर्डे प्रतिष्ठान पुरस्कार, सातारा
  • बिष्णू बसू सन्मान, कोलकत्ता
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार २०१७
  • अस्मि कृतज्ञता सन्मान २०१८
  • 'सूर्य पाहिलेला माणूस'ला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • 'समाजस्वास्थ्य'नाटकातील भूमिकेकरता महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार २०१८
  • प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार, नाशिक
  • 'तन्वीर सन्मान २०१८' - डॉ.श्रीराम लागू यांच्या 'रूपवेध' तर्फे मानाचा सन्मान
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव पुरस्कार २०२२'
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा के.ना.काळे पुरस्कार २०२२
  • नंदकुमार रावते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक पुरस्कार २०२३
  • सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक आर्यन्स पुरस्कार २०२३
  • महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा डॉ. रवींद्र दामले स्मृती पुरस्कार २०२४
  • चैत्र चाहूल तर्फे 'ध्यास सन्मान' पुरस्कार २०२४