अतुल गावंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतुल गावंडे हे अमेरिकेतील एक ख्यातनाम मराठी डॉक्टर आहेत. ते बोस्टनच्या ब्रिगहॅम ॲन्ड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तसेच द डाना फार्बर कॅन्सर इन्स्टिस्ट्यूट येथे शल्यविशारद, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक व न्यूयॉर्कर या नियतकालिकात विज्ञानविषयक स्तंभ लिहिणारे लेखक आहेत. ते संशोधन व स्तंभ लेखनासाठी असलेल्या मॅकऑर्थर पारितोषिकाचे विजेते आहेत.[१] लोकहिताचे लेखन केल्याबद्दल २०१०चा नॅशनल मॅगेझिन पुरस्कार गावंडे यांना मिळाला आहे.

'फॉरेन पॉलिसी' या प्रख्यात अमेरिकन नियतकालिकाने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीतील ८ भारतीयांमध्ये डॉ. अतुल गावंडे हे एक होते. अमेरिकन आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल घडविणारा अतुल गावंडे यांचा ’ग्लोबल पेशंट सेफ्टी चॅलेंज नावाचा कृतिआराखडा आज जगभरातील ३ हजारांहून अधिक हॉस्पिटलांमध्ये राबविला जात आहे.

डॉ. अतुल गावंडे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स (या पुस्तकाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.)
  • द चेकलिस्ट मॅनिफॅस्टो
  • बेटर

संदर्भ[संपादन]