अण्वस्त्र प्रसारबंदी करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अण्वस्त्र प्रसारबंदी करारात जगातील देशांचे धोरण
     सही केली व करारात सहभाग      करारास सहमती      सहभागातुन माघार      सही करण्यास नकार

अण्वस्त्र प्रसारबंदी करार (इंग्लिश: Nuclear Non-Proliferation Treaty) हा विध्वंसक अण्वस्त्रांची वाढ थांबवण्यासाठी जगातील बहुतांशी देशांनी मान्य केलेला करार आहे. १ जुलै १९६८ रोजी आयर्लंडफिनलंड ह्या देशांनी हा करार जगापुढे मांडला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंग्डमचीन ह्या अण्वस्त्रे बाळगणाऱ्या ५ राष्ट्रांसह एकुण १८९ देशांनी आजवर अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सह्या केल्या आहेत.

भारत, पाकिस्तान, उत्तर कोरियाइस्रायल ह्या चार अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी मात्र अण्वस्त्र प्रसारबंदी करार नाकारला आहे. ह्यापैकी भारत, पाकिस्तान व उत्तर कोरियाने जाहीरपणे अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत, तर इस्रायलकडे अण्वस्त्रे असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.

अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे एकुण तीन स्तंभ वर्णन केले गेले आहेत.

  1. प्रसारबंदी
  2. नि:शस्त्रीकरण
  3. अणुउर्जेचा शांततापूर्वक वापर

[संपादन] भारत व अण्वस्त्र प्रसारबंदी करार

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये