अडलाई स्टीव्हन्सन दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अडलाई स्टीवन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
अडलाई स्टीव्हन्सन दुसरा

अडलाई स्टीव्हन्सन (Adlai Ewing Stevenson II; ५ फेब्रुवारी १९००, लॉस एंजेल्स – १४ जुलै १९९६५, लंडन) हे एक अमेरिकन राजकारणी व मुत्सद्दी होते. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेले स्टीव्हन्सन त्यांच्या वक्तृत्वासाठी व उदारमतवादी धोरणांसाठी प्रसिद्ध होते.. १९४९ ते १९५३ दरम्यान इलिनॉय राज्याच्या राज्यपालपदावर राहिलेल्या स्टीव्हन्सनला १९५२ व १९५६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन मिळाले होते. परंतु ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये आयसेनहॉवर यांनी स्टीव्हन्सनचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला.

१९६१ साली राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी स्टीव्हन्‍सनची युनोवर अमेरिकेचे राजदूत म्हणून नेमणूक केली. ह्या पदावर असताना १४ जुलै १९६५ रोजी लंडन येथे त्यांचा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला.

बाह्य दुवे[संपादन]