अगस्ता
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अगस्ता(किंवा हदगा) (शास्त्रीय नाव: Sesbania Grandiflora, सेस्बानिया ग्रँडिफ्लोरा) हा दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा वृक्ष आहे.
इतर नावे :
- संस्कृत - अगस्त्य, मुनिद्रुम, कुंभयोनि
- मराठी - अगस्ती
- हिंदी भाषा - अगस्ता, बाक, बासना, हतिया
- कानडी - अगासे, केपागसे
- गुजराथी - अगाथियो
अनुक्रमणिका |
वर्णन [संपादन]
ही झाडे सुमारे ८ ते १० मीटर उंच असतात. या झाडास पिवळट पांढऱ्या वा लालसर रंगाची फुले येतात त्यावरून हदग्याच्या दोन उपजाती होतात.. पाने आवळ्याप्रमाणे असतात. हे झाड नाजुक असते व याचे ३ ते ५ वर्षापेक्षा जास्त आयुष्मान असत नाही. यास कोकणात हदगा म्हणतात. फुले-साधारणतः फेब्रुवारीत.
उपयोग [संपादन]
- सर्वसाधारण - पानांची व शेंगांची भाजी खाणे शरीरास हितकारक होते.
- आयुर्वेदानुसार - सर्दी,डोकेदुखी,सुज,वायुविकार,रातांधळे,इत्यादी रोगांवर.
- यापासून बनणाऱ्या औषधी - भस्मास तांबडे रंगविण्यास वापर.
संदर्भ [संपादन]
- वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
- गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर) (हिंदी)
- इंडियन मेडिसिनल प्लांट्स (खंड ४) (इंग्लिश)
बाह्य दुवे [संपादन]
- एफ.ए.ओ. ऑर्ग - अगस्त्याबद्दल माहिती (इंग्लिश मजकूर)