अक्षौहिणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राचीन भारतात सैन्य रचनेला अक्षौहिणी म्हटले जात. हे एक सैन्यदल मोजण्याचे एकक होते.

एका अक्षौहिणी सैन्यात साधारणपणे खाली नमूद केल्याप्रमाणे सैन्यक्षमता होती.

गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति = १ पत्ति
३ पत्ति = १ सेनामुख
३ सेनामुख = १ गुल्म
३ गुल्म = १ गण
३ गण = १ वाहिनी
३ वाहिनी = १ पृतना
३ पृतना = १ चमू
३ चमू = १ अनीकिनी
१० अनीकिनी = १ अक्षौहिणी

१,१०,००० पायदळ
६५,००० घोडदळ
२१,८७० हत्तीदल
२१,८७० रथदल

महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने ११ अक्षौहिणी तर पांडवाच्या बाजूने ७ अक्षौहिणी सैन्य लढले होते.