अकोला किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

{{माहितीचौकट किल्ला | नाव = अकोला किल्ला | उंची = | प्रकार = भुईकोट | श्रेणी = सोपी | ठिकाण = अकोला, [[महाराष्ट्र | अवस्था = अव्यवस्थित | गाव =अकोला अकोला महाराष्ट्र । ताब्यात =मोगल, इंग्रज । सध्या ताब्यात = पुरातत्व विभाग, भारत सरकार । बांधला =असदखाँ १६९७ मध्ये




===विशेषता===
       अकोला शहरातील किल्ला हा असदगड नावाने ओळखला जातो. हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने असदखाँच्या देखरेखीखाली १६९८ मध्ये बांधून पूर्ण केला (ईदगाह वरील शिलालेख). हा तसं म्हटल्यास किल्ला नसून संरक्षक तटबंदीचा बुरूज आहे. या तटबंदीस एकूण तीन बुरूज अनुक्रमे असद बुरूज, फतेह किवा पंच बुरूज, अगरवेस बुरूज असून, यातील पहीले दोन बुरूजच अस्तित्वात आहेत. असद बुरूजालाच असदगड म्हणून ओळखले जाते. तटबंदीस चार दरवाजे अनुक्रमे दहीहंडा वेस, अगर वेस, गंज वेस आणि शिवाजी किंवा बाळापूर वेस, यातील पहीले दोन दरवाजेच अस्तित्वात आहे. यातील अगर वेस गोविंद आप्पाजी याने १८४३ साली बांधलेली आहे. असद बुरूजावर हवामहल म्हणून एक अर्धवट पडकी इमारत अस्तित्वात आहे, ज्यात असदखाँ राहात असावा.