अंग (प्राचीन राज्य)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अंग हे प्राचीन भारतातील एक राज्य व १६ महाजनपदांमधील एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदात आढळतो. बौद्ध ग्रंथांत अंग व वंग यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. महाभारतातील उल्लेखांनुसार आधुनिक भागलपुर, मुंगेर व त्यानजीकच्या बिहार व बंगाल यांमधील क्षेत्र अंग देशात मोडत असे. अंग देशाची राजधानी चंपा येथे होती. हे जनपद मगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी अंगाच्या राजांनी बृहद्रथ व ब्रह्मदत्ताच्या सहयोगाने मगधाच्या काही राजांना हरवलेही होते; परंतु कालांतराने त्यांचे सामर्थ्य क्षीण झाले व त्यांना मगधाकडून पराजित व्हावे लागले [१].
राजा दशरथाचा मित्र लोमपाद व महाभारतातील कर्ण यांनी अंग देशावर राज्य केले होते.
हेही पाहा [संपादन]
संदर्भ [संपादन]
- ↑ नाहर, डॉ. रतिभानु सिंह (इ.स. १९७४). प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास. अलाहाबाद, भारत: किताबमहल, पृ. १११-११२. (हिंदी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||